वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल देबब्रत पात्रा यांची सरकारकडून आगामी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पात्रा सध्या आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी विभागामधील कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत राहिले आहेत. ते पतधोरण समितीचे (एमपीसी) सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
23 जुलै 2019 रोजी विरल आचार्य यांनी राजीनामा दिल्यानंतर आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पद रिक्त होते. त्यानंतर या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर अंतिम निवड ही पात्रा यांची करण्यात आली आहे. त्यांना पतधोरण निश्चि करणाऱया समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटता आर्थिक विकासदर, बरोजगारी यासह अन्य क्षेत्रातील मंदी आदी घटना हातळयाची जबाबदारी पात्रा यांच्याकडे राहण्याचे संकेत आहेत.








