केवळ सुदैव म्हणून मोठा अनर्थ टळला, स्मार्टसिटीच्या अर्धवट कामांमुळे घडताहेत अपघात
प्रतिनिधी / बेळगाव
आरपीडी-वडगाव रोडवरील गोमटेश शाळेजवळ दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहन उलटले. सुदैवानेच या घटनेमध्ये कोणालाही इजा झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावर त्यावेळी विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर स्मार्टसिटीच्या कामांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
शहरातील विविध रस्त्यांची कामे स्मार्टसिटी अंतर्गत सुरू आहेत. तब्बल 2 ते 3 वर्षे झाली. ही कामे सुरू आहेत. यासाठी रस्त्यावरच खडी, माती व इतर साहित्य टाकण्यात आले आहे. गोमटेश विद्यापीठाजवळ मंगळवारी सकाळी बोलेरो वाहन जात होते. यावेळी येथे बाजूला असलेला मातीचा ढिगारा तर दुसऱया बाजूला रस्त्याचे काम अर्धवट अशातच तेथे दोघे जण बोलत थांबले होते. यावेळी मातीच्या ढिगाऱयामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.