प्रतिनिधी /बेळगाव
आरपीडी कॉर्नर येथे धोकादायक स्थितीत डेकोरेटीव्ह पथदीप टाकण्यात आला आहे. ट्रान्स्फॉर्मरच्या शेजारी हा पथदीप टाकण्यात आला असून, येण्या-जाण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे एखादा अपघात होण्यापूर्वी तो पथदीप हटविण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
आरपीडी चौक येथे दररोज शेकडो नागरिक ये-जा करीत असतात. आरपीडी कॉलेज रोडवर कोसळलेला जुना विद्युत खांब ट्रान्स्फॉर्मर शेजारी टाकण्यात आला आहे. याचसोबत हेस्कॉमच्या भूमिगत विद्युत वाहिन्या वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे विद्युत वाहिनी व पथदीप हटविण्याची मागणी केली जात आहे.









