ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू काश्मीर सरकारने आरटी-पीसीआर टेस्ट संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने निर्देश दिले आहेत की, राज्यातील कोणतीही खाजगी प्रयोगशाळा आता आरटी-पीसीआर टेस्टसाठी 400 रूपयांपेक्षा अधिक रक्कम आकारू शकणार नाही.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील कोरोना कर्फ्यू सोमवारी संपला असून आज पासून राज्यात नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार सर्व 20 जिल्ह्यांमध्ये विकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू रात्री 8 वाजल्या पासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत जारी असणार आहे. यासोबतच 15 जून पर्यंत सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग सेंटर आणि विद्यापीठे बंद असणार आहेत.









