बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील रस्ते वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा जनतेवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाला खासगी बस आणि स्कूल बस तात्पुरत्या भाड्याने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या बसेस नियमित मार्गावर धाव घेतील. सर्व जिल्ह्यात खासगी बस चालविण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे सरकारने आम्हाला निर्देश दिले आहेत,” असे केएसआरटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.









