सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 31 जानेवारी पासून शाळा सुरू करण्यापूर्वी र्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी rt-pcr टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसा फतवा शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी काढला होता. त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शवला असून सिंधुदुर्गातील शाळा येत्या 31 जानेवारीला सुरू करण्याचा निर्णय सर्व शिक्षक संघटना व मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. ज्या शिक्षकांनी दोन डोस घेतले आहेत ते कुठल्याही परिस्थितीत rt-pcr टेस्ट करणार नाहीत तर फक्त एक डोस घेतलेले शिक्षक हे rt-pcr टेस्ट करणार आहेत असा निर्णयही शिक्षक संघटनांच्या बैठकीत झाला आहे.









