नवी दिल्ली
बँकांच्या आरटीजीएस सेवेमुळे अनेकांना आपले पैशाचे व्यवहार करणे सोयीस्कर होते आहे. आता ही सेवा येत्या सोमवार 14 डिसेंबर 2020 पासून 24 तास उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. इतर देशांमध्ये ही सेवा दिली जात असून भारतही आता या सेवेत महत्त्वाचा वाटा उचलण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रगत देशांसोबत भारताची वाटचाल होत आहे. नेफ्टप्रमाणेच आरटीजीएसची सेवा व्यावसायिकांसह अनेकांना लाभदायी ठरते आहे. सध्याला दररोज 6.35 लाख व्यवहार होत आहेत.









