प्रतिनिधी/कोल्हापूर
वाहतूक नियम मेडल्यानंतर दंड आकारला जातो. दंडाच्या पैशाची भरपाई तुम्ही करू शकाल मात्र स्वताःचा जीव महत्वाचा आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी ताराराणी चौक परिसरात बुधवारी वाहनधारकांना गुलाब फुल देऊन गांधीगिरी करत नियम पाळा व अपघात टाळा असे आवाहन केले.
31 वा रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेकडून वाहनधारकांचे प्रबोधन केले जात आहे. यासाठी शाळा कॉलेज, कारखाने या ठिकाणी व्याख्याने, चर्चा सत्रे, निबंध स्पर्धा घेवून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून वाहतूक नियमांची माहिती होऊन शिस्त लागावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रस्ते अपघात व त्यातून होणारे मृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या आदेशनुसार वाहनधारकांचे प्रबोधन केले जात आहे.
बुधवारी सकाळी 11 वाजता ताराराणी चौकात थांबून डॉ. स्टीव्हन अल्वारीस व त्यांच्या सहकाऱयांनी विना हेल्मेट वाहन चालवणारे, ट्रिपल सीट, एकाच दुचाकीवर पत्नी व दोन मुले असा प्रवास, सीट बेल्टचा वापर न करणारे,विना हेल्मेट, सुसाट दुचाकीस्वार, परवाना-कागदपत्रे जवळ न बाळगणे, सिग्नलचा भंग करणे अशा प्रकारे वाहतूकीचे नियम मोडणाऱया वाहनधारकांना थांबवून त्यांना गुलाबाचे फुल देत गांधीगिरी पध्दतीने त्यांचे प्रबोधन केले.
दुचाकीवर पत्नी व दोन मुलांसह जाणाया एका जोडप्याला थांबवून अशा प्रकार जीव धोक्यात घालून प्रवास करू नका असे सांगितले, पत्नी व मुलांनाही याचे गांभिर्य लक्षात आणून दिले. दुपारी 1 वाजेपर्यंत हे प्रबोधन सुरू होते. जयसिंगपूर येथील घोडावत इन्स्टटिय़ुटचे विद्यार्थी,सायरस पुनावाला स्कुल,डॉ.डी.वाय.पाटील इंजिनDिारिंग कॉलेज,पंचगंगा सहकारी साखर कारखाना याठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने चालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.
पोलीस कर्मचाऱयाबरोबरही गांधीगिरी
बुधवारी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ताराराणी चौकात गांधीगिरी पध्दतीने प्रबोधन करण्यात येत होते.त्यावेळी एक पोलीस कर्मचारी दुचाकीवरुन हेल्मेट न घालता निघाला होता.अधिकाऱयांनी पोलीस कर्मचाऱयाला थांबवून गुलाबपुष्प देत गांधीगिरी केली.
गुरुवारी सायकल रॅली
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रबोधन करण्यासाठी गुरुवारी सकाळी 7 ः00 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.डेक्कन स्पोर्ट सायकलिंग ग्रुपच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे.पितळी गणपती,पोलीस अधीक्षक कार्यालय चौक,महावीर कॉलेज,वाहतूक शाखा,दसरा चौक,स्टेशन रोडमार्गे ताराराणी चौक,धैर्यशील मंगल कार्यालय चौक,पितळी गणपती ते पुन्हा आरटीओ कार्यालय असा मार्ग आहे.या रॅलीत प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.स्टीव्हन अल्वारीस यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी होणार आहेत.









