फेब्रुवारीपासून प्रारंभ, भौगोलिक सीमाही निश्चित
प्रतिनिधी /बेळगाव
2022-23 सालासाठी मार्गसूची सार्वजनिक शिक्षण खात्याने जाहीर केली आहे प्रवेशाचे वेळापत्रक देण्याबरोबरच प्रवेशासाठी अर्हता निश्चित करणे, विविध संज्ञांचे विश्लेषण देखील देण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आरटीई समन्वय अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेला 7 जानेवारी रोजी सविस्तर मार्गसूची प्रसिद्ध करून प्रारंभ करण्यात आला आहे. विविध टप्प्यानुसार 30 एप्रिल रोजी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आरटीई प्रवेशासाठी भौगोलिक सीमा निश्चित करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी संबंधित महसूल गाव, नगरपालिका, पंचायतकरिता संपूर्ण शहर तर महानगरपालिकेसाठी संबंधित वॉर्ड ‘शेजारील’ शाळा या ………………. समाविष्ट करण्यात आला आहे. संबंधित भौगोलिक सीमेअंतर्गत शाळामध्येच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून त्यासाठी सर्व सहकारी, अनुदानीत आणि विना अनुदानीत शाळा मॅप करण्यात येणार आहेत. या शाळामध्ये पहिली किंवा एलकेजीसाठी 25 टक्के या प्रमाणात विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने विना शुल्क प्रवेश मिळणार आहे.
खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळविण्यासाठी बालक आणि आई किंवा वडील यांचे आधारकार्ड, जात आणि उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रकासह ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. अनाथ बालक, दिव्यांग. एचआयव्ही संसर्गित बाधित, स्थलांतरीत आणि फूट पाथवरील बालक, दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱयांचे आपत्य इ. विशेष प्रवगोतील राखीवता मागणाऱया अर्जांची सत्यता पडताळण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱयांवर सोपविण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत अनुदानित शाळांमध्ये पहिली इयत्तेसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण दिला जाणार आहे. त्यांना ऑनलाईनद्वारेच होणार आहे अपूर्ण अर्जाबाबत संबंधित पालकांना एम.एस.द्वारे कळविण्यात येणार आहे. पालकांनी त्यावर तत्काळ प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
आरटीई वेळापत्रक
| 1 | मार्गसुची जाहीर | 7 जानेवारी 2022 |
| 2 | प्रवेश पोर्टलचा डेपो | 18 जानेवारी |
| 3 | सरकारी, अनुदानीत, विना अनुदानीत नजीकच्या हंगामी यादी जाहीर | 18 जानेवारी |
| 4 | नजीकच्या शाळाबाबत हरकती नोंदविणे | 24 जानेवारी |
| 5 | शाळांची अंतिम यादी उपलब्ध जणांची माहिती जाहीर | 24 जानेवारी |
| 6 | प्रयोगीक तत्वावर अर्जांची मुदत | 1 फेब्रुवारी- 2 फेब्रुवारी |
| 7 | प्रत्यक्ष अर्जाची मुदत | 3 फेब्रुवारी ते 3 मार्च |
| 8 | अर्जांची पडताळणी | 4 फेब्रुवारी ते 7 मार्च |
| 9 | लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र उमेदवाराची अंतिम यादी | 14 मार्च |
| 10 | पहिल्या फेरीतील जागा वाटप | 23 मार्च |
| 11 | शाळा प्रवेश प्रारंभ | 24 मार्च ते 4 एप्रिल |
| 12 | दुसऱया फेरीतील जागा वाटप | 19 एप्रिल |
| 13 | दुसऱया फेरीतील प्रवेशाची मुदत | 20 एप्रिल ते 30 एप्रिल |









