आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
प्रतिनिधी / सोलापूर
आरटीई शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये दाखला घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शाळेकडून फी वसूली थांबवा या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आज गुरुवारी निवेदन देण्यात आले. तसेच दोषींवर कारवाई करावी व पालकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
आरटीई शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुल किंवा मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. ह्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शाळेची फी ही शासनाकडून शाळेंना देण्यात येते. परंतु सोलापुरातील काही खासगी शाळांमध्ये आरटीई मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ही शाळा फी वसूल करीत आहेत. असा तक्रारी अर्ज आम आदमी पार्टी सोलापूरला प्राप्त झाले आहेत.
सोलापुरातील पालक हे आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. असे कळते. सर्व पालकांची अशी मागणी येत आहे. कि शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांना पदावरून काढून टाकण्यात यावे. इंडियन मॉडेल स्कूल, सोलापूर मधील एका आरटीई पाल्याकडून वसूल केलेली फीचे बँक टरानझेकशनची प्रत झोडलेली आहे. ह्या आणि अश्या असंख्या पाल्यांकडून अशी किती फी शाळेकडून वसूल करण्यात आली ह्याची सखोल चौकशी होऊन कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली.









