पणजी, मुरगावसाठी उमेदवारांची घोषणा
प्रतिनिधी /पणजी
येत्या 14 फेब्रुवारी रोजी होणाऱया गोवा विधानसभा निवडणुकीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. त्यात पणजीतून राजेश रेडकर तर मुरगावातून परेश तोरसेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेतून पक्षाचे नेते मनोज परब यांनी ही यादी जाहीर केली. यावेळी मांदेच्या उमेदवार सुनयना गावडे व मयूर आर्सेकर यांची उपस्थिती होती. यावेळी महिला सक्षमीकरण व कल्याणासाठीच्या योजनेची घोषणा करण्यात आली. दोन हजार प्रति महिना किंवा तीन लाखापर्यंत व्यावसायासाठी कर्ज देण्यात येईल जे पुन्हा घेणार नाही. दहा लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज, लाडली लक्ष्मी लग्नावेळी 100000 आणि जर शिक्षणासाठी घ्यायची असेल तर 2.50 लाख पर्यंत. स्वसंरक्षण प्रशिक्षणासह महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही, महिला सुरक्षा मोबाइल ऍप, अखंड 24 तास केंद्रीकृत महिला हेल्प लाइन क्रमांक, विशेष महिला पोलीस तुकडी मजबूत केले जाईल, असे परब यांनी सांगितले.
आरोग्य सेवा, घरगुती हिंसाचार, विशेष वाहतूक, महिला उद्योजकता प्रशिक्षण केंद्र, छोटे व्यवसाय केंद्र, गावात उपलब्ध असलेल्या बचत गटांना पाहिजे ते समर्थन देणार. जेणेकरून महिला खऱया अर्थाने स्वावलंबी बनतील व स्वतःच्या कष्टाने मर्यादेपेक्षा अधिक कमाई करण्याची संधी त्यांना मिळेल परब यांनी पुढे सांगितले.









