प्रतिनिधी / उस्मानाबाद
महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 58 शांत मोर्चे निघाले राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अनेकदा निवेदन आंदोलने मोर्चे काढून सातत्याने याविषयी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मराठा समाज हा आज आर्थिक सक्षम नसल्यामुळे आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर उतरून सरकारकडे न्याय मागतो आहे. परंतु मागच्या सरकारने कायद्याच्या चौकटीत बसून दिलेले 13 टक्के आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असल्याने मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या राज्य सरकारने कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी भिलाई केली त्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली. पण यापुढे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही किंवा आरक्षणावर स्थगिती हटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार मराठा बांधव आता यापुढे शांत राहणार नसल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तुळजाई नगरीतील मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या परवाला मार्गदर्शन करताना केले.
यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की तुळजाई नगरी तुळजाभवानी माता ही कायमच मराठ्यांची ऊर्जा’दायी आहेत. असल्याने सर्वच विधी असो वा कार्यक्रम आई भवानीच्या आशीर्वादाने करत असतो केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी तात्काळ मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा मराठा बांधव मी स्वतः हा अन्याय सहन करणार नाही त्यामुळे भविष्यात जोपर्यंत अंत आरक्षणावर स्थगिती उठत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार मराठा बांधव शांत आहे याचा अर्थ भविष्यात काहीच करणार नाही असा नाही. त्यामुळे आमच्या संयमाची परीक्षा न घेता मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री यांच्यासह केंद्र सरकारने ही मराठ्यांना न्याय देण्यासाठी पावले उचलावीत अन्यथा ठोक मोर्चा चे पाऊल या पुढे संयमी नसणार असाही इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावण नगरीत सरकारच्या विरोधात महाजागर सकल मराठा समाजाचा वतीने मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसऱ्या पर्वास आरंभ झाला शुक्रवार दि. ९ ऑक्टोंबर दुपारी वेळ १२ ते १ च्या दरम्यान शिवाजी महाराज चौका ,छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज मा.खासदार संभाजी राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,मल्हार, राणाजगजितसिंह पाटील, सचिन रोचकरी,विशाल रोचकरी, सकल मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








