प्रतिनिधी / मुंबई
धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खास धनगरी वेशात ढोल वाजवत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार आंदोलन केले. धनगर समाजाच्या प्रश्नाकडे राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोही आमदार पडळकर यांनी यावेळी केला. राज्य सरकारच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विविध प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवन समोर आंदोलन केले. अशातच धनगर समाजाच्या आरक्षणा सह विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले. समाजाच्या सोहळा प्रलंबित मागण्यांचे फलक आणि धनगरी वेशात ढोल वाजवत आमदार पडळकर यांनी विधानभवनासमोर प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण पण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रसाद लाड सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत आमदार पडळकर यांना आंदोलन करू दिले. यावेळी काही वेळ आमदार पडळकर यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. आमदार पडळकर यांच्या या या हटके आंदोलनामुळे राज्याचे लक्ष वेधले.