पाचगाव /वार्ताहर
आर के नगर येथील गणेश नगर रुमाले माळ मधील सुजित सखाराम वडर (वय १०) याचा सोमवारी दुपारी विहिरीत बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी तीन वाजता सुजित आपल्या मित्रासह गणेश नगर रुमाले माळ मधील शेतातील एका विहिरीत हातपाय धुण्यासाठी गेला होता. यावेळी सुजित तोल जाऊन विहिरीत पडला. यानंतर त्याचा लहान मित्र ओरडत पळाला .परिसरातील युवकांनी विहिरीत उतरून सुजित चा शोध घेतला आणि त्याला पाण्याबाहेर काढले. मात्र सुजित मृतावस्थेत आढळला .सुजित चे वडील डंपर ड्रायव्हर आहेत या घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशन मध्ये झाली आहे
Previous ArticlePrevious Post
Next Article कोरोना : रिलायन्सकडून 500 कोटींची मदत जाहीर









