पाणी नसल्याने बंद अवस्थेत : नागरिकांना करावी लागते भटकंती
प्रतिनिधी/ बेळगाव
नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पाणपोई उभारण्यात आल्या होत्या. पण देखभालीअभावी पाणपोईचे अस्तित्व संपु÷ात आले आहे. सध्या शुद्ध पाण्याची मागणी असल्याने स्मार्ट सिटीत आरओ प्लँटची उभारणी करण्यात आली. पाणी पुरवठय़ाअभावी हे प्लँट देखील काही महिन्यातच बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील बनले आहे.
शहरात पाणीटंचाईची समस्या उद्भवत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. विशेषतः बाजारपेठेत येणाऱया नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तेंड द्यावे लागते. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागात आरओ प्लॅंट उभारण्यात आले आहेत. मात्र पाण्याअभावी हे आरओ प्लँट बंद अवस्थेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तसेच न्यायालय आवारात येणाऱया नागरिकांच्या सोयीसाठी दोन ठिकाणी आरओ प्लँट उभारण्यात आले आहेत. मात्र पाणीपुरवठा होत नसल्याने आरओ प्लँटद्वारे पाणी मिळत नाही.
सध्या पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिण्याचे पाणी मुबलक मिळत नाही. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लँटचा आधार घेत आहेत. पण आरओ प्लॅंटमध्येदेखील पाणी नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून धर्मवीर संभाजी चौक, नरगुंदकर भावे चौक, श्रीनगर गार्डन, न्यायालय आवार, गोवावेस, वडगाव बालोद्यान अशा विविध ठिकाणी आरओ
प्लॅंटची उभारणी केली आहे. पण पाणीटंचाईच्या काळातच पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. प्लॅंटची देखरेख करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीच्या कंत्राटदाराची आहे. पण प्लॅंट उभारणी केलेल्या काही महिन्यांतच बंद पडू लागल्याने भवितव्य काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.