प्रतिनिधी / शिराळा
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त के. बी. उमाप यांनी माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. माजी आमदार नाईक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी के. बी. उमाप शिराळा येथे आले होते.
के.बी. उमाप यांनी प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून शिराळा येथे काम केले आहे. तसेच शिवाजीराव नाईक बांधकाम व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री असताना ते त्यांचे “खाजगी सचिव” म्हणून कार्यरत होते.
यावेळी सातारा उत्पादन शुल्क अधीक्षक अनिल चास्कर, उत्पादन शुल्क निरीक्षक श्रीकांत हूनगरे, महिंद्र बोबडे, सत्यजित नाईक, अभिजित नाईक आदी उपस्थित होते.








