उपमहापौरांमुळे सोलापूरचे नाव बदनामः शाब्दी
प्रतिनिधी / सोलापूर
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे आणि विभागीय अधिकारी नीलकंठ मठपती यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणार्या भाजपचे महापौर राजेश काळे यांचा एमआयएमच्यावतीने निषेध करण्यात आला असून हा अतिशय लाजीरवाणा प्रकार असून यामुळे शहराचे नाव बदनाम झाल्याचे शहराध्यक्ष ङ्गारूक शाब्दी यांनी म्हटले आहे.
गुरूवारी एमआयएमच्या पदाधिकार्यांनी आयुक्त आणि उपायुक्तांची भेट घेतली आणि पक्षाच्यावतीने त्यांना पाठिंबा दिला. यावेळी शाब्दी म्हणाले की, राजेश काळे यांचे वागणे लाजीरवाणे आहे. लोकप्रतिनिधीने असे वागणे बरोबर नाही. अधिकारी जर काम करत नसतील तर त्यांना सांगण्याचे अनेक प्रकार असतात. मात्र त्यांना शिवीगाळ करणे हे न शोभणारे आहे. उपमहापौर राजेश काळे यांच्यामुळे सोलापूरचे नाव बदनाम झाले आहे. याचा निषेध करावा तेवढे थोडाच आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. ज्या ठिकाणी जनतेवर, अधिकार्यांवर अन्याय होईल, तेथे एमआयएम त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचे शाब्दी यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका वाहिदा भंडाले, नगरसेवक काझी जहागिरदार, कामगार जिल्हाध्यक्ष शकील शेख, मोहसीन मैंदर्गीकर, कम्मो शेख, मोईन शेख, नदीम भंडाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









