भारतात प्रवेश करण्यासाठी पीएमओच्या संपर्कात कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एलॉन मस्क यांची कंपनी ही भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी विविध टप्प्यावरील प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचे मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. यामध्ये टेस्ला भारतात प्रवेश करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात (पीएमओ) आहे. त्यांनी सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवर आकारण्यात येणारे आयात शुल्क कमी करुन मिळावे यासाठी सरकारकडे प्रस्ताव दाखल केला आहे.
सदर मागणीसोबत काही देशातील ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपत्ती असल्याचे म्हटले आहे. त्याचे म्हणणे आहे, की यामुळे देशातील गुंतवणूकदारांच्या विश्वासाला धक्का लागेल असेही म्हटले जात आहे.
देशात चालू वर्षातच वाहन विक्री सुरु?
टेस्ला कंपनी ही चालू वर्षात आपल्या गाडय़ा विकण्यास सुरु करण्याच्या तयारीत आहे. तसेच बाजारातील चाचपणी करून आयात कार आणण्याची शक्यता आहे. परंतु ही कार आयात करण्यासाठी आयात शुल्क लागू केल्याने कंपनीला अडचण होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे सरकारने इलेक्ट्रिक कारकडे अन्य कार प्रमाणे बघू नये असेही टेस्लाने स्पष्ट केले आहे.
मस्क आणि पंतप्रधान यांच्यात मुलाखतीसाठी प्रयत्न
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेस्ला आपले मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुलाखत निश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी टेस्ला कंपनी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.









