ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली संयुक्त अरब अमिरातीच्या दोन खेळाडूंना रविवारी निलंबित केले. दोन्ही खेळाडूंनी भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आयसीसीने केला आहे.
आमिर हयात आणि अशफाक अहमद अशी निलंबन करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे आहेत. दोन्ही खेळाडूंवर लाच घेतल्याचा आरोप आहे. आयसीसीने त्यांच्या विरोधात पाच खटले निकाली काढले आहेत. या दोन्ही खेळाडूंना प्रत्युत्तर देण्यासाठी आयसीसीने 24 दिवसांची मुदत दिली आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये आयसीसी पुरुष वर्ल्डकप पात्रता फेरीच्या सामन्यांदरम्यान अमिराती क्रिकेट बोर्डाने अशफाकला निलंबित केले होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध कोणताही खटला दाखल करण्यात आला नव्हता.