499 रुपयांमध्ये 5 लाखाचे विमा संरक्षण
प्रतिनिधी/ मुंबई
आयसीआयसीआय लोम्बार्डने फोनपे सोबत भागीदारी केली असून यांच्या मदतीने आता डोमेस्टिक मल्टी ट्रिप इन्शुरन्स कवचचे सादरीकरण केले आहे. लोम्बार्डाला अनलिमिटेड ट्रिप्ससाठी फक्त 499 रुपयांची रक्कम वर्षाला ट्रव्हल इन्शुरन्स संरक्षणासाठी द्यावे लागणार आहेत. यामध्ये संबंधीत ग्राहकांना जळपास 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. ही सुविधा फोनपेच्या सहाय्याने ऑनलाईन स्वरुपात खरेदी करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
ऑन इन वन इन्शुरन्स स्वरुपात ही सोय मिळणार आहे. यामध्ये विविध प्रकारचा नफा ग्राहकांसाठी दिला जाणार आहे. यामध्ये ट्रिप्स रद्द होणे, प्रवासादरम्यान घरात चोरी होणे, विमान प्रवासादरम्यान विमान चुकल्यास, साहित्य हरवल्यास अपघातात जखमी किंवा मृत्यू झाल्यास या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
सर्व प्रकारच्या प्रवासावर विमा
कंपनीच्या माहितीनुसार ग्राहकांसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास केल्यास त्यांना ही विमा सुविधा मिळणार आहे. देशात रस्ते, रेल्वे किंवा हवाई प्रवास करणाऱयांना विमा सुविधा मिळेल.









