सांगली /प्रतिनिधी
पाणी उतरणेचा वेग उद्या दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे. कालचे तुलनेत कोयना विसर्ग 24,000 तर वारणा विसर्ग 9,200 ने कमी आहे.
कोयनेने विसर्ग १० हजारावर आणला, दरवाजे दीड फुटावर
सध्या कोयना धरणात 91.21 tmc पाणीसाठा आहे. बुधवारी संध्याकाळी 6.00 वाजता विसर्ग कमी करून एकूण विसर्ग 10000 cusecs करण्यात आला आहे. रेडियल गेट 5 फुटावरून दीड फुटावर आणण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीतील पाणी गतीने कमी होण्यास मदत होणार आहे.








