नवी दिल्ली
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आयबीएमने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) सोबत एकत्रितपणे काम करण्याची घोषणा केली आहे. आयबीएम व आयओसीएल डिजिटल संदर्भात विशेष योजना आखणार असल्याची माहिती आहे. दोन्ही कंपन्यांनी एकत्रित येत एक मोबाईल ऍप आणि पोर्टलची रचना केली आहे. सध्या जवळपास 13 कोटी ग्राहकांना याच्या आधारे सेवा दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच 12,400 आयओसी वितरक ऍप आणि पोर्टलचा वापर करणार आहेत.









