कंपनीकडून आवश्यक कागदपत्रे सेबीकडे जमा -लॉकडाऊनमध्ये फूड डिलिव्हरी तेजीत
मुंबई
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने अखेर आपला आयपीओ बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये रेग्युलेटर सेबीजवळ यासंदर्भातील सर्व कागदपत्रे बुधवारी जमा केली असून यातून कंपनी जवळपास 8 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याचीही माहिती आहे.
कंपनीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार सेबीजवळ ड्राफ्ट जमा केला आहे. कोणत्याही आयपीओसाठी सर्वात पहिला टप्पा हा असल्याचेही म्हटले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सेबी यांचे पूर्ण अध्ययन करणार असून याच्यानंतरच आयपीओला मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
ऑनलाईन डिलिव्हरी तेजीत
मागील वर्षातील मार्चमध्ये प्रथमच कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे ऑनलाईन डिलिव्हरीमध्ये मजबूत तेजी आली आहे. याचा सकारात्मक लाभ हा झोमॅटोला होत गेल्याचे झोमॅटोचे सह संस्थापक दिपिंदर गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
2,486 कोटीचा महसूल
झोमॅटोने आर्थिक वर्ष 2020 मध्ये जवळपास 2,486 कोटी रुपयाचा महसूल प्राप्त केला असल्याची माहिती असून यामध्ये 2,451 कोटी रुपयाचा तोटा झाला असल्याचीही माहिती आहे.









