55 कंपन्यांच्या चालू वर्षात रक्कम जोडण्याचे ध्येय- एलआयसी सर्वोच्च स्थानी राहण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
2021 मध्ये आयपीआंsच्या क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये चालू वर्षांत अंदाजे आयपीआंsच्या आधारे 2 लाख कोटी रुपयाचा निधी उभारला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आर्युविमा महामंडळाचा (एलआयसी) निव्वळ आयपीओ 90 हजार कोटीच्या घरात राहण्याचे संकेत असल्याची माहिती आहे.
चालू वर्षात एलआयसीसह अन्य मोठे आयपीओ बाजारात सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये एचडीबी फायनान्शिअल 9 हजार कोटी रुपये, आधार हाऊसिंग 8 हजार कोटी आणि देलहीववरी 6 हजार कोटी रुपये जमा करण्याची माहिती आहे.
आतापर्यंत 7 कंपन्यांनी उभारला निधी
चालू वर्षातील आतापर्यंत सात कंपन्यांनी 12 हजार कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. यामध्ये आगामी काळात जवळपास 55 कंपन्यांचा समावेश राहणार आहे. यातील एकूण कंपन्या अंदाजे 1 लाख कोटी रुपये उभारणार असल्याचे म्हटले आहे.
आयपीओंच्या प्रवासातील कंपन्या
आयपीओ सादर करण्यात येणाऱया कंपन्यांमध्ये साधारणपणे पुढील कंपन्यांचा समावेश आहे, यामध्ये कल्याण ज्वेलर्स 1,750 कोटी, आरोहण फायनान्शिअल 1,800 कोटी, मॅक्रोटेल डेव्हलपर्स 2,500 कोटी, पॉलिसी बाजार 3,500 कोटी रुपये, स्टार हेल्थ इन्शुरन्स 5 हजार कोटी रुपये यांचा समावेश असणार आहे.









