भांडवली बाजारात 5 आयपीओ जानेवारीत दाखल होणे शक्य : वर्षभरात 15 कंपन्यांचे आयपीओ येण्याचे संकेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सरत्या वर्षाच्या शेवटी दाखल झालेल्या आयपीओंना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून यंदा वर्षभरात 15 कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नववर्षाच्या सुरूवातीलाच बाजाराने नवी उंची गाठल्याने कंपन्या आता आयपीओ आणण्यासाठी अधिक उत्सुक असल्याचे समजते.
सध्या भारतामध्ये विक्रमी टप्प्यावर कार्यरत असणारा शेअर बाजार आणि समाधानकारक असणारी बाजाराची स्थिती पाहता कंपन्यांमध्ये आयपीओ सादर करण्याची मोठी चढाओढ सुरु झाली आहे. कोरोना संकटामुळे प्रभावित झालेल्या कंपन्या रक्कम उभारण्यासाठी मागील वर्षाच्या दुसऱया सहामाहीपासून आयपीओ लाँचिंग करत आहेत. याचाच प्रभाव म्हणून 2021 मध्ये एकूण 15 कंपन्या आयपीओ आणण्याचे संकेत आहेत.
नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच फक्त जानेवारीमध्ये 5 आयपीओ भांडवली बाजारात येणार आहेत. या अगोदर 2020 मध्ये 16 कंपन्यांनी 31 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आयपीओच्या मदतीने उभारली आहे.
एक्सचेंज डाटाच्या माहितीनुसार 2020 मध्ये एकूण 16 कंपन्यांच्या आयपीओ पैकी 15 कंपन्यांचे आयपीओ वर्षाच्या दुसऱया सहामाहीपासून आले आहेत. ज्यामध्ये स्टेट बँक कार्डचा आयपीओ 2020 च्या मार्चमध्ये सादर झाला होता. यानंतर कोरोना महामारीच्या प्रभावाने शेअर बाजाराची स्थिती अतिशय कठीण झाली आणि कंपन्या आयपीओ सादरीकरण करुन विक्री करु लागले.
साधारणपणे दुसऱया सहामाहीमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये बाजारात सकारात्मक संकेत पहावयास मिळाल्याने कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात दाखल करण्यास सुरूवात केली. तसेच ऑगस्ट, सप्टेंबरनंतर बाजारानेही तेजी कायम ठेवल्याने अनेकांनी आयपीओ आणण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं.
जानेवारीत सादर होणारे आयपीओ…
- कंपनी………………………… आयपीओ आकार
- इंडिया पेन्ट्स……………. 1,000 कोटी रुपये
- होम फर्स्ट फायनान्स कंपनी 1,500 कोटी रुपये
- इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन 4,600 कोटी रुपये
- बुकफील्ड रिट….. 4,000-4,500 कोटी रुपये
- रेलटेक कॉर्पोरेशन 700 कोटी रुपये









