बेंगळूर/प्रतिनिधी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान क्रिकेट सट्टेबाजी केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी चार जणांना अटक केली, अशी माहिती सह पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिली. याआधीही आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेताना सीसीबी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांची कारवाई सुरु असूनही आयपीएल सट्टेबाजीचा खेळ सुरूच आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडून तीन लाखांची रोकड व चार मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. आयपीएलच्या सामन्यासाठी आरोपी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामान्य दरम्यान क्रिकेट सट्टेबाजीचे रॅकेट चालवत होते.









