मुंबई \ऑनलाईन टीम
यंदाच्या आयपीएल मोसमात अस्तित्वासाठी झगडत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि विराट सेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात आज (सोमवार दि. 3) सामना होणार होता. मात्र आता आयपीएला देखील कोरोनाने गाठले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आज कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणार सामना रद्द होण्याची शक्यता आहे. आयपीएल वेळापत्रकानुसार हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर नियोजित होता.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाही. वरुण आणि संदीपची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्याची शक्यता आहे’, असं एएनआयला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा अॅड झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय यांनी मायदेशी परतले आहेत. त्यानंतर घरच्यांना करोनाची लागण झाल्याने आर. अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे.









