नवी दिल्ली
सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया(एसटीपीआय) यांच्यासोबत नोंदणीकृत असणाऱया कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 च्या दरम्यान 4.21 लाख कोटी रुपयांची निर्यात केली आहे. एसटीपीआयचे महासंचालक ओंकार रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यात क्षेत्र व सॉफ्टवेअर निर्यातीला चालना देण्यासाठी एसटीपीआयची दिशा देशाच्या आर्थिक विकासाला बळकटी देणारी ठरणार असल्याचे म्हटले आहे. या कार्यासाठी भारत सहयोगात्मक पातळीवर 21 डोमेन सेंट्रिक सेंटर ऑफ एक्सलेंसीची स्थापना करण्याचा विचार करत आहे.









