364 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू, बेळगाव तालुक्मयात 200 जणांना लागण
प्रतिनिधी बेळगाव
हलभावी येथील इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या आणखी 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आयटीबीपी, एअरफोर्स, राज्य राखीव दलात रुग्णसंख्या वाढती आहे. शुक्रवारी दिवसभरात 364 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 6 जण दगावले आहेत. बाधितांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 200 जणांचा समावेश आहे.
बेळगाव शहर व उपनगरातील 108 व ग्रामीण भागात 92 असे तालुक्मयात 200 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव येथील दोघे जण, हिरेबागेवाडी, बैलहोंगल, गोकाक, हुक्केरी येथील एकूण 6 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. सरकारी व खासगी इस्पितळातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनाही बाधा झाली आहे.
शुक्रवारी अंकलगी, यमकनमर्डी व बेळगाव पोलीस हेडक्वॉटर्समधील तीन पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन खासगी डॉक्टरांसह पाच आरोग्य कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. एका नामवंत संस्थेच्या 70 वषीय संचालकांचा अहवालही पॉझिटिव्ह आला असून अथणी येथील 43 वषीय डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.