तांत्रिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना घेता येणार प्रवेश
प्रतिनिधी /बेळगाव
इंडस्ट्रियल टेनिंग इन्स्टिटय़ूट (आयटीआय) 2021-22 अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. दहावीचा निकाल लागताच आयटीआय प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन स्वरुपात सुरुवात झाली. 27 ऑगस्टपर्यंत इच्छुक विद्यार्थी आयटीआयसाठी प्रवेश अर्ज भरू शकतात.
कर्नाटक राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण व रोजगार विभागाच्यावतीने एक अधिसूचना जाहीर केली असून, त्याद्वारे यावषीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. दहावी पास विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात. संबंधित विद्यार्थ्यांने कमीत कमी पाच वर्षे कर्नाटकात शिक्षण घेतलेले असणे जरुरीचे आहे. सरकारी आयटीआय कॉलेजसाठी 1 हजार 200 रुपये तर सरकारी अनुदानित खासगी संस्थांमध्ये 2 हजार 400 रुपये फी आकारली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
आयटीआयची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात आहे. अर्ज करणाऱया विद्यार्थ्याला आधारकार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, जात व उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी (गव्हर्न्मेंट ऑफ कर्नाटका इंडस्ट्रियल टेनिंग ऍण्ड एम्प्लॉयमेंट) या वेबसाईटवर माहिती पहावी व अर्ज करावा.









