शिपायालाही अटक : लाच घेताना रंगेहाथ पकडले
प्रतिनिधी / बेळगाव
आयटीआय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल परीक्षेत पास करण्यासाठी लाच घेणाऱया प्राचार्य व शिपायाला गुरुवारी एसीबीच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले आहेत. रामदुर्ग येथे ही कारवाई करण्यात आली
आहे.
प्राचार्य रामनगौडा बाबागौडा पाटील व शिपाई बसवराज रामाप्पा मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर सिद्धनकोळ्ळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरुवारी 14 हजारांची लाच स्वीकारताना प्राचार्य रामनगौडा बाबागौडा पाटील व शिपाई बसवराज रामाप्पा मोहिते यांना रंगेहाथ पकडले आहे.
एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपअधीक्षक महांतेश्वर जिद्दी, पोलीस निरीक्षक अडवीश गुदीगोप्प, सुनीलकुमार व
त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.









