येत्या काही महिन्यात उपकरणांच्या निर्मितीवर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयटी कंपनी टेक महिंद्रा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आयटीआय लिमिटेडसोबत तंत्रज्ञानसंदर्भात भागीदारी करण्याच्या अंतिम टप्प्यात आली असून कंपनी 4 जी आणि 5 जी उपकरणांची निर्मिती करण्यास सक्षम असल्याची माहिती कंपनीच्या एका वरि÷ अधिकाऱयांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱया भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचे पडसाद हे दोन्ही देशाच्या व्यापारावर पडत गेल्याने आता भारताने स्वदेशीचा स्विकार करण्यावर भर दिला असून यात आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत नवीन संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती टेक महिंद्रा नेटवर्कचे सेवा विभागातील सीईओ मनीष व्यास यांनी दिली आहे.
येत्या काळात स्वदेशी संकल्पनेवर आधारीत सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून कंपनीने जूनमध्ये 4 जी आणि 5 जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आयटीआय लिमिटेडसोबत करार केला होता. तसेच सदरच्या कामासाठीची रचना करण्यात आल्याची माहितीही व्यास यांनी दिली आहे.
सरकारी नियामावलीसोबत आयटीआय सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या नेटवर्क स्थापनेसाठी वापरण्यात येणाऱया उपकरणांचा पुरवठा करण्याच्या साठय़ाचाही यात समावेश करण्यात येणार आहे.
संरक्षण क्षेत्रातील कंत्राट
कंपनीला संरक्षण क्षेत्रात संचार नेटवर्क उभारण्यासाठी जवळपास 7,796 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. यामुळे अन्य उत्पादनास लवकरच सुरुवात करुन 4 जी आणि 5 जी नेटवर्कची सक्षमपणे उभारणी करण्यास कंपनी योग्य योगदान देणार असल्याचेही स्पष्ट केले आह









