नवी दिल्ली
फर्निचर व फर्निशिंग्ज रिटेलच्या क्षेत्रात कार्यरत कंपनी आयकिया भारतात आपल्या व्यवसायाचा अधिक विस्तार करणार असल्याचे समजते. आपल्या व्यवसायात कंपनी कोरोनानंतर अधिक गतीने लक्ष केंद्रीत करणार आहे. स्वीडनची मूळची कंपनी आयकियाने भारताचा जगातील टॉप 5 बाजारपेठांमध्ये समाविष्ट होणार असल्याचे म्हटले आहे.
भारतात फर्निचर साठवणूक व पुरवठा करण्यासाठी कार्यालये मोठय़ा संख्येने स्थापन करण्यासाठी आयकियाचे प्रयत्न राहणार आहेत. आतापर्यंत याकरीता 6 हजार कोटींचा खर्च इमारतींच्या बांधकामासाठी करण्यात आला आहे. कंपनीला भारतात विस्तारासाठी 2013 मध्ये सरकारने परवानगी दिली होती. याअंतर्गत कंपनीला 10 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतात मोठय़ा शहरात स्टोअर्स स्थापन करून यायोगे फर्निचरची विक्री व पुरवठा करण्याचे कार्य कंपनी भारतात करते आहे. कोरोनानंतर भारतीय बाजारात फर्निचरला मागणी वाढीव राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतात फर्निचर व्यवसायाला गती घेण्याची संधी असणार आहे.









