ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सोमवारी रात्री आयकर विभागाची नवीन वेबसाईट लाँच करण्यात आली. ही वेबसाईट आज क्रॅश झाली असून, त्याचे फोटो करदात्यांनी ट्विटवर शेअर केले. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी इन्फोसिस आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना ट्विटरवरूनच धारेवर धरले.
सोमवारी रात्री 8.45 वाजता आयकर विभागाचे ई-फायलिंग पोर्टल लाँच करण्यात आले होते. हे पोर्टल करदात्यांच्या सोईचे आहे. मात्र, हे पोर्टल सुरू होण्यास अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे करदात्यांनी हे फोटो ट्विटरवर अपलोड केले. त्यानंतर सीतारामन यांनी करदात्यांचे ट्विट इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत नव्या पोर्टलमुळे करदात्यांची गैरसोय होणार नाही, अशी अपेक्षा होती. ग्राहक सेवेला प्राधान्य हवे, असे सुनावले.









