तीन वर्षांत सदरच्या केंद्रांची उभारणी करणार
नवी दिल्ली
दिवसागिणक वाढत जाणाऱया पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे देशात अन्य पर्यायांचा विचार केला जात आहे. यामध्ये सध्या देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एक वेगळा निर्णय घेतला आहे. कंपनी आगामी तीन वर्षांच्या कालावधीत जवळपास 10,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार असल्याची माहिती आहे. यातील साधारणपणे 2,000 ईव्ही स्टेशन केंद्रे येत्या वर्षभरात उभारणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे सीएमडी एसएम वैद्य यांनी दिवाळीच्या अगोदर एक दिवस पत्रकार परिषद घेऊन आगामी तीन वर्षांच्या कालावधीत जवळपास 10,000 केंद्रांची उभारणी करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.









