मडगाव : आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर 13 मार्च रोजी खेळविण्यात येणार आहे. फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडने प्ले-ऑफमधील सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले. यंदा या स्पर्धेत 11 संघांनी भाग घेतला असून 115 सामने खेळविण्यात येणार आहेत. सलग तिसऱयांदा फातोर्डा स्टेडियमवर आयएसएल फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येईल. पहिल्या लेगमधील उपान्त्य सामना 5 आणि 6 मार्च तर दुसऱया लेगमधील सामना 8 व 9 मार्च रोजी खेळविण्यात येईल. उपान्त्य सामने बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर व फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून अंतिम लढत नेहरु स्टेडियमवर होईल. लीग टप्प्यातील सामने 28 फेब्रुवारीपर्यंत खेळविण्यात येतील. सध्या एटीके मोहन बागान 36 गुणानी पहिल्या स्थानावर तर मुंबई सिटी 34 गुणांनी दुसऱया स्थानावर आहेत. हे दोन्ही संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









