प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येची गरज ओळखत आय एम ए ने सांगलीत 3 सप्टेंबर पासून स्वतःचे कोविड सेंटर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा वाढता आकडा आणि रुग्णांना आवश्यक असणारी गरज ओळखत आय एम ए चे पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हॉटेल प्राइड येथे हे केंद्र सुरू करण्यात येईल असे महापालिके कडून स्पष करण्यात आले आहे.








