ऑनलाईन टीम
योगगुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धती आणि अॅलोपॅथी डॉक्टरांवर वादग्रस्त विधान केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. बाबा रामदेव यांच्या या विधानावरून बराच वाद पेटला. हा सगळा वाद शांत होण्याआधीच या वादात भाजपाच्या नेत्या साध्वी प्राची यांनी उडी घेतली आहे. साध्वी यांनी अॅलोपॅथी डॉक्टरांची देशातील शिखर संघटना असलेल्या ‘आयएमए’वर टीका केली आहे.
आयएमएच्या लोकांनो लक्ष देऊन ऐका, वाटीभर पाण्यात बुडून मरा. लाज वाटू द्या. आयुर्वेदावर चिखलफेक करणाऱ्यांनो नीट ऐका, बाबा रामदेव देशासाठी खूप मोठं कार्य करत आहेत. ते कोट्यवधी लोकांना बरं करत आहेत. भारतात धर्मांतराचा खेळ सुरू असून, केंद्र सरकारने यावर कठोर कारवाई करावी असे वादग्रस्त विधान केलं आहे. तर, माठातील पाण्यामुळे कुणीही आजारी पडत नाही, फ्रीजमधील पाण्याने पडतं. हे आयुर्वेद सांगत, पण परदेशी कंपन्यांचे दलाल ख्रिश्चन लोक याचा विरोध करतात,” असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे.
इतकच नाही साध्वी यांनी यावेळी मदर तेरेसाबद्दलही संतापजनक विधान केले आहे . “आयएमएच्या माध्यमातून १९८२मध्ये एक एनजीओ (स्वयंसेवी संस्था) बनवली गेली होती. भारतात मदर तेरेसा नावाची एक जादूगार होती, जी लोकांना स्पर्श करूनच बरं करायची. त्यांचा मृत्यूही रुग्णालयात झाला होता,” असे म्हटलं आहे.
बाबा रामदेव यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आयएमएने संताप व्यक्त करत बाबा रामदेव यांना मानहानीची नोटीसही पाठवली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र दिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. देशातील कोरोना परिस्थितीवरून सगळीकडे चिंता व्यक्त होत आहे. यातच बाबा रामदेव यांच्याकडून डॉक्टराची थट्टा उडवणारं अशी विधान केली जात आहेत. यात आता साध्वी प्राची यांची भर पडल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









