प्रतिनिधी/ बेंगळूर
बहुचर्चित आयएमए ज्वेलर्सच्या फसवणूक प्रकरणात आरोप असलेले आयएएस अधिकारी बी. एम. विजयशंकर यांनी मंगळवारी रात्री आत्महत्या केली आहे. बेंगळूरच्या जयनगर येथील निवासस्थानी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. त्यांनी बेंगळूर जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले होते.
राज्यातील हजारो जणांना गुंतवणुकीच्या मोबदल्यात अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखवून 4 हजार कोटी रुपयांचा चूना लावणाऱया आयएमए ज्वेलर्स आणि समूहाला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आयएमएला ना हरकत प्रमाणपत्र देऊन याच्या मोबदल्यात आयएमएचा मालक मोहम्मद मन्सूर खान याच्याकडून 1.5 कोटी रुपये लाच घेतल्याच्या आरोप विजयशंकर यांच्यावर होता. या प्रकरणी एसआयटीने त्यांच्या निवासावर छापा टाकून 2.5 कोटी रुपये जप्त केले होते. या प्रकरणी जुलै 2019 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यांना बेंगळूर जिल्हाधिकारी पदावरून निलंबितही करण्यात आले होते. अलिकडेच त्यांची जमीनावर सुटका झाली होती.









