नवी दिल्ली
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने दुसऱया तिमाहीअखेर पाचपट निव्वळ नफा नोंदला असल्याची माहिती आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱया तिमाहीत 154 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. तिकीट महसुलातही विक्रमी वाढ झाली आहे. 220 कोटी रुपयांची वसुली तिकीट महसूलातून झाली आहे. मागच्या वर्षी समान अवधीत हा महसूल 61 कोटी रुपयांचा होता.









