हैदराबाद
स्मार्टफोन बनविणारी चीनची प्रमुख कंपनी ओप्पोने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) हैदराबाद बरोबर 5 जी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी करार केला आहे. ओप्पोने सोमवारी याची माहिती देत करारावर 13 जानेवारीला स्वाक्षरी झाल्याचे सांगितले. यामुळे उद्योनमुख आणि प्रगत तंत्रज्ञानामध्ये अत्याधुनिक शोध आणि विचारांच्या आदान-प्रदानाची सुविधा मिळणार आहे. पॅमेरा, प्रतिमेवर प्रक्रिया करणे, बँटरी, 5 जी नेटवर्क आणि एआयवर पुढील दोन वर्षात अनेक प्रकल्पांवर संशोधन आणि विकास केला जाणार आहे, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.








