पंतप्रधान मोदींचं ‘ते’ वक्तव्य तालिबानने आव्हान म्हणून स्वीकारले
ऑनलाईन टीम
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती भयंकर बनली आहे. अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. तर तालिबान्यांकडून नागरिकांचा छळ केला जात असल्याचा घटना समोर येत आहेत. अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारत सरकारनेही आता पर्यंत जवळपास 800 नागरिकांना भारतात आणले आहे. यासर्व परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथ मंदिर येथील काही प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी भाष्य केले होते. दहशतवादाच्या माध्यमातून स्थापन केलेली सत्ता ही कायम स्वरुपी नसते असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी तालिबान्यांना लगावला होता. मोदींचं हे वक्तव्य दहशतीच्या बळावर अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानला बोचलं आहे.
तालिबानचा प्रमुख नेता शहाबुद्दीन दिलावरने मोदींचं हे वक्तव्य आव्हान म्हणून स्वीकारल आहे. आम्ही दहशतीच्या बळावर मिळालेली सत्ता टीकवून दाखवू असं त्यांने यावेळी म्हटलं आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये योग्य पद्धतीने प्रशासकीय कारभार चालवत असल्याचं लवकरच भारताला दिसून येईल असं मत देखील दिलावरने यावेळी व्यक्त केले. ‘रेडिओ पाकिस्तान’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये भारताने लक्ष देऊ नये असा इशाराच दिला आहे.
या मुलाखतीत तालिबानचा प्रमुख नेता दिलावरने पाकिस्तानचा उल्लेख मित्रराष्ट्र असा केला आहे. तर, ३० लाखांहून अधिक अफगाणिस्तानी नागरिकांना पाकिस्तानने आश्रय दिल्याने त्यांचे आभार देखील मानले. तालिबानला जगातील प्रत्येक देशासोबत शांततापूर्ण आणि सामंजस्यावर आधारित सन्मानजनक संबंध ठेवण्याची इच्छा असल्याचंही दिलावर म्हणाला.
Previous Article37 हजार लाभार्थी घरांच्या स्वप्नात…!
Next Article श्रीपेवाडीत 550 जणांना कोरोना प्रतिबंधक लस









