पुणे / ऑनलाईन टीम
सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत, ही लस आम्हाला सरकारला मिळणार्या १५० रुपयांत मिळावी. याबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आठवड्याभरानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोव्हिशील्ड लशीची आधीची किंमत ‘अॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित होती व आता आपल्याला लशीचे उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे असे सांगून, या लशीची किंमत आधीच्या किमतीपेक्षा दीडपट ठेवण्याचे देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने समर्थन केले आहे.
Previous Articleलॉकडाऊनचा गैरफायदा घेत मुदत संपलेला माल ग्राहकांच्या माथी
Next Article सांगली : मिरजेतही मनपाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल








