प्रतिनिधी / आमोणे
आमोणे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने दर वर्षीप्रमाणे दहावीत विषेश श्रेणीत पास विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम तसेच त्याच विद्यालयात गेली दहा-बारा वर्षे मुख्याध्यापकपदी कार्यरत असलेले गोविंद नाईक यांचा गौरव नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सालीया गावस, तर मुख्य पाहुणे शिक्षण खात्यातून तुकतेच निवृत्त झालेले संचालक दिलीप भगत, खास निमंत्रीत भाजपा महिला अध्यक्षा सुलक्षणा सावंत, खाण खात्याचे अधिकारी सुधिर मांद्रेकर, सत्कारमूर्ती गोविंद नाईक, पंच काशिनाथ म्हातो, शाबा गावस, विजेश सावंत, पंचायत सचिव सुभाष कांबळे, मुख्याध्यापक उल्हास गावकर आदि मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
सरपंच गावस यांनी प्रास्ताविक तसेच मान्यवरांची ओळख व स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते या वेळी समई प्रज्वलित करण्यात आली. तद्नंतर आमोणे विद्यालयातील 2019-20, 2020-21 या वर्षात 10 वी बोर्डाच्या परीक्षेत विषेश श्रेणीत पास विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. नंतर आमोणे विद्यालयातील ज्यानी राज्य क्रिडा स्पर्धेत व राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेल्या अकरा विद्यार्थ्यांनाही राज्यक्रिडा व पुष्प देऊन सन्मानित केले.
यावेळी नाईक याने पंचायतीला धन्यवाद देऊन आपल्या कार्यकाळात पंचायतीतर्फे मिळालेल्या सहयोगाचे सविस्तर सांगून विद्यालयाच्या चांगल्या निकालाचे श्रेय इतर विषय शिकवणाऱया शिक्षकांना दिले.
आमोणे पंचायतीचे गावच्या विकासाबरोबर शिक्षण क्षेत्रात चांगले सहकार्य करीत असल्याचे पंचायतीला धन्यवाद दिले व विद्यार्थ्यांने पुढील शिक्षणात चांगले गुण प्राप्त करण्याचे आवाहन भगत याने केले.
विद्यार्थ्याना कॅरीअर गायडंन्सची फार आवश्यकता असून ते प्राप्त करावे तसेच विज्ञान शाखेतच नव्हे तर इतर शाखमध्येही प्रवेश घेऊन त्यातही यश प्राप्त केल्यास लौकीक मिळेल असे उद्गार कार्यक्रमाच्या खास निमंत्रीत सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केले या संपुर्ण कार्यक्रमाचे शुभनिवेदन पंचा संघवी फडते यांने केले तर पंच काशिनाथ म्हातो यांनी आभार व्यक्त केले.









