ऑनलाईन टीम / मुंबई
बॉलिवूड अभिनेता आमिर खान काही दिवसापूर्वी सोशल मीडियाला बाय-बाय केले होते. यामुळे आमिर खान चांगलाच चर्चेत आला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आमिरने याविषयी माहिती दिली होती. आमिर त्याचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यावर आमिरने आता पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर खान मुंबईत मंगळवारी ‘ई जाने’या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आला होता. यावेळी आमिरला सोशल मीडिया अकाउंट डिलीट करण्याबाबत विचारण्यात आले. यावेळी आमिर खान म्हणाला की, तुम्ही लोक याबाबत कोणतेही तर्क लावू नका. तसे पण मी सोशल मीडियावर असोतच कुठे व मी काही पोस्ट देखील करत नाही. मी चाहत्यांना बाय-बाय केलेले नाही. मी इथेच आहे, कुठे जाणार नाही. यापूर्वी देखील मी चाहत्यांशी संवाद साधत होतो आणि आता देखील साधणार आहे. त्यांच्या संपर्कात राहणार आहे. यामध्ये मीडियाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण आता मीडियाच्या माध्यमातून मी चाहत्यांच्या संपर्कात राहू शकेल. तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे की, माझा पूर्ण विश्वास हा तुमच्यावर आहे, असे आमिर खान यावेळा म्हणाला.
नुकताच आमिर खानने त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरून एक्झीट घेतली. आमिरने त्याचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले होते. आमिरने चार वर्षातच सोशल मीडियाला अलविदा म्हटले. तसा इतर बॉलिवू़ड मंडळीच्या तुलनेत आमिर खान सोशल मीडियावर कमीच सक्रीय होता.









