जत / प्रतिनिधी
जतच्या उत्तर भागातील आवंढी भागात बंदीस्त पाईपलाईन मधून म्हैसाळ योजनेचे पाणी गुरुवारी दाखल झाले. गेल्या आठ दिवसांपूर्वीच आमदार विक्रम सावंत यांनी या भागाला पाणी देण्याचा शब्द दिला होता. आमदार सावंत यांनी दिलेला शब्द खरा केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
म्हैशाळ योजनेतून गुरुवारी अंतराळ सिंगनहळळी बंदिस्त जल वित्रीका पाईप लाईनचे अंतराळ येथे आमदार सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया काका बिराजदार, बाबासाहेब कोडग,जि.प.सदस्य दिग्विजय चव्हाण, रवींद्र सावंत, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, प्रदीप कोडग, सहायक कार्यकरी अभियंता अमोल चोपडे यांच्यासह ग्रामस्त उपस्थित होते.
यावेळी आमदरा सावंत म्हणाले, जत तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणणे हे माझे ध्येय आहे. यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. चालू उन्हाळी आवर्तनात या भागात पाणी देण्याचा शब्द दिला होता, आज तो पूर्ण होत आहे, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री विश्वजित कदम यांनीही चांगली मदत केली. आता मे महिन्यापर्यंत उमदी भागात पाणी देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









