प्रतिनिधी / बेळगाव
हिरेबागेवाडी येथील रयत सेवा केंद्रामध्ये शेतकऱयांना सोयाबीन बियाणांचे वितरण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातर्फे करण्यात आले. लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. बियाणे पेरणी सुरू होईल. मात्र, कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मदत व्हावी म्हणून ही बियाणे वाटप करण्यात आली. शेतकऱयांच्या समोर आज अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यांची दखल कोणी घेत नाही. शेतकरी नेहमीच वंचित राहिले आहेत. मात्र तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मागण्या मी संबंधित अधिकाऱयांना आणि मुख्यमंत्र्यांना कळवेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी शंकर गणाचारी, सी. सी. पाटील, अडिवेश इटगी, सुरेश इटगी, गौस जालिकोप, श्रीकांत भरमण्णावर आदी उपस्थित होते.









