वार्ताहर / खोची
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा आवळे यांनी खोचीसह परिसरातील आरोग्य उपकेंद्रांना सदिच्छा भेट देऊन आरोग्यविषयक माहिती घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या. खोची ता.हातकणंगले येथे आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी, कोरोना दक्षता समिती,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस व ज्येष्ठ नागरिक यांची बैठक घेऊन कोरोना रोगाविषयी आढावा घेतला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व दक्ष राहावे,असे आवाहन केले. व प्रशासनाला योग्य त्या सूचना देवून मास्क प्रदान केले व योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच अमरसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य इलाई देसाई, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस भैरवनाथ पवार,सुशेनराव शिंदे- सरकार,हणमंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील,सुनील पाटील,नाना इंगळे, ग्रामसेवक विठ्ठल चव्हाण आदीसह मान्यवर उपस्थित होते.