प्रतिनिधी/आटपाडी
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक व अन्य सहकारी असे झरे येथील ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. गुरूवारी आटपाडी तालुक्यात एकुण १४ लोक कोरोना पॉझिटिव्ह आले. तर आमदार गोपीचंद पडळकर हे मात्र निगेटिव्ह आल्याने कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला.
आटपाडी तालुक्यात दिवसागणिक कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या चिंताजनक बनली आहे. तालुक्यातील आत्तापर्यंतची एकूण संख्या ४००च्या घरात आहे. ही आकडेवारी दररोज वाढतच चालली आहे. गुरुवारी भाजपचे युवा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्विय सहाय्यक, सुरक्षा रक्षक व अन्य सहकारी असे एकूण पाचजण पॉझिटिव्ह आले. तर आमदार पडळकर यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गतीमान करण्यासाठी सरकारने साधने देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. तसेच केंद्र सरकार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन व्हेंटीलेटरसह अन्य साधने मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले. कोरोनाचा कम्युनिटी संसर्ग सुरू झाला असून लोकांनी दक्षता घेत प्रशासनाला, आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
दरम्यान, आटपाडी शहरात हाकेमळा येथे पन्हा नव्याने आठ लोक कोरोना पॉझिटिव्ह आले. तर दिघंची येथे एकजण असे सायंकाळपर्यंत तालुक्यात एकुण १४ लोक पॉझिटिव्ह आले. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असलीतरी लोकांमध्ये दक्षतेबाबत गांभीर्य नसल्याचे विदारक चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








