बेळगाव
उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी सोमवारी शहरातील विविध विकासकामांना चालना दिली. शाहूनगर येथील शिवालयामध्ये पहिल्या पावती बुक व करपत्रकाचे पूजन आमदार अनिल बेनके व कारंजीमठाच्या स्वामींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पाच लाखांचा निधी श्रीराम मंदिरासाठी जमा करण्यात आला. श्रीराम मंदिरासाठी निधी संकलित केला जात असून या मंदिरासाठी हा निधी देण्यात आला. यावेळी कारंजीमठाचे स्वामी परमेश्वर हेगडे, कृष्णा भट, श्रीकांत कदम, अशोक शिंत्रे यासह रहिवासी उपस्थित होते.
बसवण कुडची येथील देवराज अर्स कॉलनीतील नवीन काँक्रिटीकरणाच्या रस्ताकामाचा शुभारंभ आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी अल्पसंख्याक अभिवृद्धी योजनेंतर्गत 60 लाखांच्या निधीतून हे काम होणार आहे.
याप्रसंगी केआरआयडीएल अधिकारी, अभियंते राघवेंद्र तिरागी, प्रमोद पाटील, विजय कदम, ऍड. दिवटे, सुनील मायाण्णाचे, बसवंत यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
अशोकनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाशेजारी असलेल्या डेनेज कामाला आमदार अनिल बेनके यांनी चालना दिली. शिवाय गटार व नवीन रस्ताकामाचा शुभारंभदेखील लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या ड्रेनेज कामासाठी 32 लाखांचा निधी खर्ची घालण्यात येणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी नरसण्णावर, कंत्राटदार एन. के. धामणेकर यासह रहिवासी उपस्थित होते.









